

कराड (ता. सातारा) : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख, कराड तालुका प्रमुख संजय मोहिते (वय ५५) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. संजय मोहिते यांनी कराड शहरसह जिल्हाप्रमुख पदापर्यंत काम केले. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.
संजय मोहिते यांनी १९९० ते २०१० या कालावधीत कराड शहरात शिवसेनेच्या माध्यमातून विविध आंदोलने, मोर्चे काढले होते. गेली पंचवीस वर्षेहून अधिक काळ मोहिते यांनी शिवसेनेत आक्रमकतेने काम केले. एक आक्रमक व धडाडीचा यूवा कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली होती. संजय मोहिते यांच्या पश्चात आई, पत्नी व मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.