सातारा : राष्ट्रवादीची संवाद यात्रा आज सातार्‍यात

सातारा : राष्ट्रवादीची संवाद यात्रा आज सातार्‍यात

सातारा : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा रविवार, दि.17 एप्रिल रोजी सातारा जिल्हा दौर्‍यावर येणार आहे. ही यात्रा सातारा, वाई, कोरेगाव, पाटण या चार मतदारसंघात जाणार असून तेथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे. सातार्‍यात राष्ट्रवादीच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्याची आढावा बैठक होणार आहे.

राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा राज्यातील 255 विधानसभा मतदारसंघ व 35 जिल्ह्यात फिरून पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे. सातारा जिल्ह्यात या यात्रेचे रविवारी आगमन होणार आहे. दि. 17 व 18 या दोन दिवसात ही यात्रा सातारा, वाई, कोरेगाव, पाटण या चार विधानसभा मतदारसंघात जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी आढावा घेतला जाणार आहे. रविवारी सकाळी 9.30 वाजता वाई येथे यात्रेचे आगमन होणार असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिली. चित्रा टॉकीज वाई येथे वाई- महाबळेश्‍वर-खंडाळा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. दुपारी 12.30 वाजता सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातील आढावा बैठक मेढा येथील कलश मंगल कार्यालयात होणार आहे.

दुपारी 3 वाजता परिवार संवाद यात्रेचे सातारा शहरात आगमन होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस भवनात जिल्हा कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांंच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. दिपक चव्हाण, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, दिपक पवार, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सायंकाळी 5.30 वाजता कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक गिताई मंगल कार्यालय मार्केट यार्ड कोरेगाव येथे होणार आहे. त्यानंतर पाटण तालुका दौर्‍यावर परिवार संवाद यात्रा जाणार असून त्या ठिकाणी मुक्काम होणार आहे. सोमवार दि. 18 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता पाटण विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक झाल्यानंतर संवाद यात्रेचा सांगली जिल्ह्यात प्रवेश होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची आज वाईत सभा

वाई : पुढारी वृत्तसेवा : वाई येथे रविवार, दि. 17 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा दाखल होत असून यावेळी पक्षाचा मेळावाही होणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेली संवाद यात्रा रविवारी सकाळी 9 वाजता वाई येथे येत आहे. या संवाद यात्रेचे स्वागत व जाहीर सभा न्यू चित्रा टॉकीज येथे होणार आहे. यावेळी होणार्‍या सभेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर, राज्याचे सहकार, पणन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील उपस्थित राहणार आहेत. सभेस कार्यकर्त्यांनी, शेतकरी, सभासद बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वाई तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी केले आहे.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news