हनुमानाने सर्वांना भक्‍तिभावाने जोडले : पंतप्रधान नरेंद्र मोदी

हनुमानाने सर्वांना भक्‍तिभावाने जोडले : पंतप्रधान नरेंद्र मोदी

मोरबी (गुजरात); वृत्तसंस्था : हनुमान यांनी आपल्या भक्‍तीने आणि सेवाभावी वृत्तीने सर्वांना जोडण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हनुमान जयंतीचे औचित्य साधून शनिवारी गुजरातमधील मोरबीमध्ये हनुमानाच्या 108 फूट उंचीच्या मूर्तीचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण झाले. त्यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भाविकांना हनुमानापासून प्रेरणा मिळते. ते शक्‍ती आणि बळाचे प्रतीक आहेत. सरकारने जंगलात राहणार्‍या समस्त बांधवांना मान आणि सन्मान दिला आहे. त्यामुळे श्रेष्ठ भारताचे हनुमान एक प्रतीक आहे. देशातील विविध भागांत रामायणाचे आयोजन केले जाते. त्यांची भाषा कोणतीही असो मात्र रामायण सर्वांना भावनिकद‍ृष्ट्या जोडते. प्रभू रामचंद्रांच्या जपाला रामायण प्रवृत्त करते, असेही मोदी म्हणाले.

देशाच्या चार दिशांना उभारणार हनुमानाची मूर्ती

पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार, भगवान हनुमानाशी संबंधित चारधाम योजनेंतर्गत देशाच्या चार दिशांना हनुमानाची मंदिरे स्थापन केली जाणार आहेत. या योजनेंतर्गत मोराबी येथे उभारण्यात आलेली हनुमानाची ही दुसरी मूर्ती आहे. ही मूर्ती देशाच्या पश्‍चिम दिशेला असून बापू केशवानंद आश्रम यांच्याकडून हनुमानाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. चारधाम योजनेंतर्गत पहिली हनुमानाची मूर्ती 2010 मध्ये सिमलामध्ये उभारण्यात आली आहे. त्यासाठी 1.9 कोटी रुपये खर्ची पडले आहेत. तिसरी मूर्ती रामेश्‍वरममध्ये उभारली जाणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news