कराड : दरेकरांनी पुराव्यानिशी माहिती दिल्यास चौकशी करू : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील | पुढारी

कराड : दरेकरांनी पुराव्यानिशी माहिती दिल्यास चौकशी करू : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

कराड : पुढारी वृत्तसेवा
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने कारवाई करण्यात आलेली नाही. प्रवीण दरेकर हे ज्या सहकारी संस्थांची पुराव्यानिशी माहिती देतील, त्या सहकारी संस्थांची सहकार खात्याकडून चौकशी केली जाईल, असे राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले .

मुंबई जिल्हा बँक निवडणूकीवेळी प्रवीण दरेकरांना सहकार खात्याने मजूर म्हणून अपात्र ठरवले होते. त्यानंतर आपच्या शिंदे नावाच्या व्यक्तीनेही याबद्दल सहकार आणि गृह विभागाकडे तक्रार केली होती. प्रवीण दरेकर हे मजूर या व्याख्येत मोडत नाहीत. विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी स्वतंत्र व्यवसाय अशी नोंद केली आहे. मजूर म्हणून नोंद केलेली नव्हती. सुरूवातीला ते मजूर असतीलही, मात्र नंतर उत्पन्न वाढल्यानंतरही मजूर म्हणूनच ते जिल्हा बँकेंत विजयी झाले होते. याकडे लक्ष वेधत हाच त्यांचा गुन्हा घडल्याचा दावाही सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केला आहे.

Toyota Mirai : पेट्रोल-डिझेलला सुट्टी! कशी आहे टोयोटा मिराई हायड्रोजन इलेक्ट्रिक कार

सहकार खात्यावर प्रवीण दरेकर यांचा राग आहे. त्यामुळेच ते आता पश्‍चिम महाराष्ट्रातील काही संस्थांची माहिती घेत आहेत. मोघम भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करण्यापेक्षा त्यांनी पुराव्यानिशी माहिती दिल्यास, सहकार खात्याकडून ते करत असलेल्या केल्या आरोपांची जरूर चौकशी केली जाईल, असेही सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचलंत का ?

Back to top button