नागपूर : हवाला रॅकेटची सव्वाचार कोटींची रोकड जप्त | पुढारी

नागपूर : हवाला रॅकेटची सव्वाचार कोटींची रोकड जप्त

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपुरात हवालाच्या माध्यमातून होणारे कोट्यवधी रूपयांचे व्यवहार पोलिसांनी शुक्रवारी उघडकीस आणले. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभार पुऱ्यातील रेणुका माता मंदिराजवळ असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. या प्रकरणी नेहाल सुरेश वडालिया (वय ३८, नागपूर), वर्धमान विलासभाई पच्चीकर (वय ४५, गोंदीया) व शिवकुमार हरिश्चंद्र दिवानीवाल (वय ५२, गोंदीया) या तिघांना अटक करण्यात आली आहे.

हिंगोली : औंढा नागनाथ येथील अपघातातील व्यक्तीचे वाचविले प्राण
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या निर्देशानुसार नागपूर शहराचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, सहायक पोलीस आयुक्त सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली रात्री उशिरा हवाला व्यापाऱ्यांवर धाडी टाकण्यात आल्या. पोलिसांच्या तीन पथकांनी एकाच वेळी धाडी टाकत तब्बल ४ कोटी २० लाखांची रोकड जप्त केली.

डोंबिवली : औषध देण्यास नकार, दोघा नशेखोरांनी मेडिकल फोडले; घटना सीसीटीव्हीत कैद

या कारवाईनंतर १००, २०० आणि ५०० नोटांमध्ये असलेली रोकड मोजण्यासाठी पोलिसांना नोटा मोजणारी मशिन आणावी लागली. पहाटेपर्यत नोटा मोजणे सुरू होते. गुजरात येथे हवालाच्या माध्यमातून पैसे पाठवण्यात येत असल्याचा संशय आहे. मात्र, ही रक्कम कुठून आली, ती कुठे पाठवण्यात येत होती, याचा तपास सुरू आहे. त्यामुळे आताच काही सांगता येणार नाही, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

पुणे : शेळगाव येथे ‘महावितरण’विरोधात बोंबाबोंब आंदोलन

Shahrukh : ‘पठाण’चा नवा लूक, ड्रायव्हरला मारली मिठी अन्… (video)

Womens World Cup : रोमांचक वनडेत ऑस्ट्रेलियाचा विजय, इंग्लंडच्या फलंदाजांच्या शतकी खेळी व्यर्थ

पहा व्हिडिओ

उधवस्त झालेलं तळीये गाव आता कुठल्या अवस्थेत आहे?

Back to top button