MBBS : एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची आत्महत्या | पुढारी

MBBS : एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

सातारा : पुढारी वृत्तसेवा
गोळीबार मैदानात राहणार्‍या प्रियांका निलकंठ आलटकर (वय 19) या युवतीने घरी गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर परिसर हादरुन गेला आहे.

दरम्यान, प्रियांका ससून वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारपासून तिची परीक्षा सुरु होणार असल्याने सोमवारी ती दुपारी पुण्याला जाणार होती. मात्र तोपर्यंत तिने गळफास घेतला. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

Back to top button