सातारा : दोन युवकांची आत्महत्या

सातारा : दोन युवकांची आत्महत्या
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा: सातारा शहरातील केसरकर पेठ व सातारा तालुक्यातील म्हसवे येथे विविध दोन घटनात दोन युवकांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनांमुळे खळबळ उडाली असून पोलिस तपास करत आहेत.

केसरकर पेठेतील प्रकाश चंद्रकांत बनपट्टे (वय 23, रा.चारभिंती परिसर) या युवकाने राहते घरी पत्र्याच्या छताच्या लाकडाला साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर तात्काळ त्याला उपचारासाठी सिव्हीलमध्ये दाखल केल्यानंतर त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आली. या घटनेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

दरम्यान, म्हसवे ता.सातारा येथे अनिकेत विठ्ठल शेलार (वय 25, रा.म्हसवे) या युवकाने राहते घरी हॉलमधील फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दि. 22 रोजी घडली असून याची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

दोन्ही ठिकाणी एका दिवसात दोन युवकांनी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे. आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नसून पोलिस माहिती घेत आहेत.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news