सातारा : खासगी सावकाराविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

सातारा : खासगी सावकाराविरोधात गुन्हा दाखल

पलटण : पुढारी वृत्तसेवा : खासगी सावकारीत लिहून घेतलेल्या जमिनीचा ताबा दिला नाही म्हणून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन शिवीगाळ केल्याची घटना फलटण तालुक्यात घडली. याप्रकरणी खाजगी सावकाराविरोधात फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

भगवान नामदेव मोहिते (रा. सोमवार पेठ, फलटण), असे संशयिताचे नाव आहे. याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कैलास दादासो मिंड (रा. टाकळवाडा ता. फलटण) यांनी सन 2014 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये फलटण येथील सोमवार पेठेतील खाजगी सावकार भगवान मोहिते याच्याकडून भाचीच्या लग्नाकरता पैशांची मागणी केली होती.

मोहिते याने फिर्यादी मिंड यांच्याकडून जमीन लिहून द्यावी लागेल असे म्हणून साठेखत व दस्त करुन घेवून फिर्यादीस 2 लाख 10 हजार रुपये रोख रक्कम साठेखत दस्त व कूळ कायद्याच्या खर्चापोटी लावली होती. फिर्यादी यांनी नोव्हेंबर 2021 पर्यंत 5 टक्के व्याज दराने दरमहा 10 हजार रुपये रक्कमेनुसार आतापर्यंत 6 लाख रुपये व्याजापोटी दिले होते.

यानंतर फिर्यादी मिंड यांनी या जमिनीचा ताबा दिला नाही म्हणून फिर्यादीस खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन शिवीगाळ करत असल्याची फिर्याद कैलास मिंड यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button