सातारा : उदयनराजेंनी हाती धरला बैलगाडीचा कासरा | पुढारी

सातारा : उदयनराजेंनी हाती धरला बैलगाडीचा कासरा

सातारा : पुढारी वृत्तसेवा: खा. श्री. छ. उदयनराजे भोसले केव्हा, कधी काय करतील, याचा नेम नाही. त्यांची प्रत्येक कृती हटके असते. त्याचाच प्रत्यय रविवारी देगाव (ता. सातारा) येथे पुन्हा आला. येथील बैलगाडी शर्यतीच्या ठिकाणी खा. उदयनराजेंनी त्यांच्या स्टाईलमध्ये एन्ट्री करत चक्‍क बैलगाडीचा कासरा हाती घेतला. डोक्यावर फेटा, गळ्यात फड्या अन् हातात कासरा अशी त्यांची आदा होती. ढोल-ताशांच्या गजरात बैलगाडीप्रेमींनी उदयनराजेंचे स्वागत केले.

यावेळी त्यांनी कॉलर उडवून वातावरणात रंगही भरला. खा. उदयनराजेंच्या स्टाईलने शर्यतप्रेमी भलतेच खूश झाले. 24 फेब्रुवारी रोजी खा. उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त देगाव येथे उदयनराजे मित्र समूहातर्फे बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी स्वत: उदयनराजे शर्यतीच्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी येथील वातावरणाचा नूरच पालटून टाकला. उपस्थित समर्थकांनी आणि बैलगाडा शर्यत प्रेमींनी एकच जल्लोष केला. डोक्यावर फेटा, गळ्यात फडया अन हातात कासरा घेऊन उदयनराजेंनी बैलगाडी हाकली. ढोल ताशांच्या गजरात बैलगाडीप्रेमींनी उदयनराजेंचे स्वागत केले.

यावेळी राजेंची खास स्टाईल उपस्थितींना पाहिला मिळाली. राजेंनी बैलगाडीवर उभे राहून हातात कासरा घेतला ( बैलगाडीचा कासरा ) आणि खास आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये कॉलर उडवली. त्यामुळे हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेल्या शर्यतीप्रेमींनी जल्लोष केला.

यावेळी उदयनराजे म्हणाले, मी शेतकरीच आहे. माझ्या इलेक्शनच्या अ‍ॅफेडिव्हटमध्ये बघा. या शर्यतीचे मी फक्‍त निमित्त आहे. याचे श्रेय उदयनराजे मित्र समुहाला आहे. हॉर्स रेसमध्ये मोठया प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. त्यामुळे तेथे बंदी घातली नाही. शेतकरी बैलांना मुलांप्रमाणे जपतात. त्यामुळे बैलगाडी शर्यती या झाल्या पाहिजेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button