सातारा : 'सेमी इंग्लिश मीडियम'च्‍या भीतीने नववीतील विद्यार्थिनीची आत्महत्या - पुढारी

सातारा : 'सेमी इंग्लिश मीडियम'च्‍या भीतीने नववीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातार्‍यातील एका उपनगरात नववीत शिकणार्‍या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ माजली. प्राथमिक माहितीनुसार ‘सेमी इंग्लिश मीडियम नको’ या कारणातून तिने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. दरम्यान, पोलिस तपास करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी दुपारी संबंधित मुलगी घरी एकटीच होती. त्यावेळी तिने पंख्याला गळफास घेतला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसर हादरून गेला. शाहूपुरी पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

सेमी इंग्लिश मीडियम नको असल्याने आत्महत्या

पोलिसांना तेथे चिठ्ठी आढळून आली. चिठ्ठीमध्ये कोणालाही जबाबदार धरु नये असे म्हणत, सेमी इंग्लिश मीडियम नको असल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात दाखल झाली असून पोलिस तपास करत आहेत.

हेही वाचलं का? 

Back to top button