सातारा : कोरेगावात शशिकांत शिंदे यांना पुन्हा हादरा | पुढारी

सातारा : कोरेगावात शशिकांत शिंदे यांना पुन्हा हादरा

कोरेगाव : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्ह्यात चुरशीची आणि प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या कोरेगाव नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेचे आ. महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनल 13-4 ने विजयी झाले आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलला त्यांनी पराभवाची धूळ चारली आहे.

जिल्ह्यात 6 नगर पंचायतीचे निकाल जाहीर झाले. यामध्ये कांटे की टक्कर असणाऱ्या कोरेगाव नगर पंचायतमध्ये आ. महेश शिंदे यांच्या पॅनलने 17 पैकी 13 जागांवर विजय मिळवला. तर आ. शशिकांत शिंदे यांच्या पॅनलला फक्त 4 जागांवर समाधान मानावे लागले.

कोरेगावच्या विजयी उमेदवारांनी आमदार महेश शिंदे यांना खांद्यावर उचलून घेत गुलालाची उधळण करत मिरवणूक काढली.

लोणंद नगरपंचायत निवडणुकीत सताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १७ पैकी १० जागा जिंकुन निर्विवाद बहुमत मिळविले. विरोधी कॉग्रेसला 3 जागा, भाजपाला 3 जागा तर 1 अपक्ष नेही बाजी मारली. शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही.

हे ही वाचा :

 

Back to top button