Dehu Nagarpanchayat : देहू नगरपंचायतीत राष्ट्रवादीची सरशी, १४ जागा मिळाल्‍याने एक हाती सत्ता | पुढारी

Dehu Nagarpanchayat : देहू नगरपंचायतीत राष्ट्रवादीची सरशी, १४ जागा मिळाल्‍याने एक हाती सत्ता

देहूरोड : पुढारी वृत्तसेवा
देहू नगरपंचायत (  Dehu Nagarpanchayat  ) झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला १४ जागा मिळाल्याने एक हाती सत्ता आली आहे.भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले तर दोन अपक्षांनी बाजी मारली आहे.

Dehu Nagarpanchayat : राष्‍ट्रवादीची एकहाती सत्ता

देहूच्या निवडणुकीकडे सर्वांचे डोळे लागले होते. आमदार सुनिल शेळके आणी माजी मंत्री बाळा भेगडे यांनी प्रचाराचा धुरळा उडवला होता. त्यामुळे मतदान कोणाच्या पारड्यात जाणार याबाबत कुतूहल निर्माण झाले होते. १७ जागांसाठी एकूण ६० जण रिंगणात होते. त्यापैकी राष्ट्रवादीने १४ जागा जिंकून एक हाती सत्ता मिळवली आहे.

आमदार सुनील शेळके यांच्या जल्लोषात सामील होण्यासाठी आले होते. त्यांनी मतदारांचे आभार मानले. भाजपने केवळ रसिका स्वप्नील काळोखे या एका जागेवर समाधान मानावे लागले. तर दोन अपक्षांनी दोन जागा मिळवल्या.

 

Back to top button