लोणंद नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्‍व | पुढारी

लोणंद नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्‍व

लोणंद ; पुढारी वृतसेवा : लोणंद नगरपंचायत निवडणुकीत सताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १७ पैकी १० जागा जिंकुन निर्विवाद बहुमत मिळविले. विरोधी कॉग्रेसला 3 जागा, भाजपाला 3 जागा तर 1 अपक्ष नेही बाजी मारली. शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही.
अपक्ष राजश्री शेळके यांनी विजय मिळविला आहे. लोणंद नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सतरा प्रभागासाठी दोन टप्यात मतदान झाले होते. एकुन16,745 मतदारापैकी12,328 म्हणजे 73.62% मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला होता.

आज बुधवार दि.19 रोजी लोणंद नगरपंचायत सभागृहात सकाळी 10 वाजता निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शिवाजी जगताप व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रभारी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीस प्रारंभ झाला.

दोन तासात मतमोजणी पूर्ण झाली. या निवडणुकीत माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके – पाटील, खंडाळा तालुका कॉग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ॲड. सर्फराज बाळासाहेब बागवान, कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस माजी नगरसेवक राजेंद्र डोईफोडे, अॅड. सुभाषराव घाडगे, कुसुम शिरतोडे, विश्वास शिरतोडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर माजी नगराध्यक्ष सचिन शेळके, यांनी विजय मिळविला. या निवडणुकीत 17 पैकी राष्ट्रवादी 10, कॉग्रेस 3, भाजपा 3,अपक्ष 1 यांनी विजय मिळविला. लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

लोणंद नगरपंचायत निवडणुक निकाल-पक्षानूसार
राष्ट्रवादी -10
कॉग्रेस – 3
भाजप – 3
अपक्ष – 1

लोणंद नगरपंचायत निवडणुक निकाल-प्रभागानूसार 

प्रभाग -1 दिपाली संदीप शेळके ( भाजपा)
प्रभाग -2 आसीया बागवान (कॉग्रेस)
प्रभाग -3 दिपाली निलेश शेळके ( कॉग्रेस )
प्रभाग -4 सचिन शेळके ( राष्ट्वादी )
प्रभाग -5 भरत शेळके ( राष्ट्रवादी )
प्रभाग -6 राजश्री शेळके ( अपक्ष )
प्रभाग -7- मधुमती पलंगे ( राष्ट्रवादी )
प्रभाग – 8- ज्योती डोनीकर
प्रभाग – 9- शिवाजी शेळके ( राष्ट्रवादी )
प्रभाग – 10 – सीमा खरात ( राष्ट्रवादी )
प्रभाग -11- भरत बोडरे ( राष्ट्रवादी )
प्रभाग -12- रशीदा इनामदार ( राष्ट्रवादी )
प्रभाग -13- तृप्ती घाडगे ( भाजपा )
प्रभाग -14- सुप्रिया शेळके ( राष्ट्रवादी )
प्रभाग -15- गणी कच्छी ( राष्ट्रवादी )
प्रभाग – 16- प्रविण व्हावळ ( कॉग्रेस )
प्रभाग – 17- रविंद्र क्षीरसागर ( राष्ट्रवादी )

हेही वाचलतं का ?

Back to top button