सातारा : लोणंद नगरपंचायतीसाठी 19 जण रिंगणात; पाच अपक्षांची माघार - पुढारी

सातारा : लोणंद नगरपंचायतीसाठी 19 जण रिंगणात; पाच अपक्षांची माघार

लोणंद : पुढारी वृत्तसेवा, लोणंद नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाच जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 4 जागासाठी 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहे. चारही प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, भाजपा, शिवसेना अशी चौरंगी लढत होणार आहे. तर तीन अपक्षही लढत देणार आहेत.

अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी पाच अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. प्रभाग 1 मधून प्रियांका बुनगे, प्रभाग क्र. 2 मधून स्वाती शेळके, प्रभाग क्र.11 मधून अमित भंडलकर, प्रभाग क्र.16 मधून मेघा व्हावळ, दत्तात्रय कचरे यांनी माघार घेतली, अशी माहिती प्रांताधिकारी शिवाजी जगताप, मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांनी दिली.

अर्ज माघारीनंतर प्रभाग 1 मध्ये राष्ट्रवादीच्या वर्षा शेळके, काँग्रेसच्या प्रतिभा शेळके, भाजपच्या दीपाली शेळके, शिवसेनेच्या अनिता माचवे यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. प्रभाग 2 मध्ये राष्ट्रवादीच्या निर्मला शेळके, अपक्ष मनीषा शेळके, काँग्रेसच्या आसिया बागवान, भाजपच्या संगीता बुटीयानी, शिवसेनेच्या राधिका जाधव यांच्यात भिडत होणार आहे.

प्रभाग 11 मध्ये राष्ट्रवादीचे भरत बोडरे, काँग्रेसचे उत्तम कुचेकर, भाजपचे श्रीकुमार जावळे, शिवसेनेचे विश्वास शिरतोडे, अपक्ष शरद भंडलकर यांच्यात लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक 16 मध्ये राष्ट्रवादीच्या विनया कचरे, काँग्रेसचे प्रवीण व्हावळ, भाजपचे प्रदीप क्षीरसागर, शिवसेनेचे गणेश पवार व अपक्ष जावीद पटेल यांच्यात लढत होणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button