सांगली : कडेगावात निर्दयी बापाकडून चिमुकल्या बालकाचा निर्घृण खून

murder
murder
Published on
Updated on

कडेगाव; पुढारी वृत्तसेवा : पत्नीवर चारित्र्याच्या संशय घेत सुरू असलेल्या भांडणात अडीच वर्षाच्या चिमुकल्या मुलाला फरशीवर आपटून रक्त बंबाळ करून निर्दयी बापानेच निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. आयुष अर्जुन सावंत असे मृत चिमुकल्या मुलाचे नाव आहे. तर याप्रकरणी संशयित आरोपी अर्जुन अनिल सावंत (रा. अंत्री बुद्रुक, ता. शिराळा, सध्या रा. शिवाजीनगर, ता. कडेगाव) याच्या विरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शिवाजीनगर ता कडेगाव येथे मंगळवार (दि.20) रोजी रात्री घडली. याबाबत मुलाची आई पिंकी अर्जुन सावंत यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, संशयित आरोपी अर्जुन सावंत याचा शिवाजीनगर येथील पिंकी सावंत हिच्याशी 2016 मध्ये विवाह झाला होता. सध्या अर्जुन हा शिवाजीनगर येथे राहत होता. अर्जुन याला दारूचे व्यसन असून तो वारंवार आपली पत्नी पिंकी हीच्या चरित्र्यावर संशय घेऊन वारंवार भांडत होता. दरम्यान मंगळवारी (दि. 20) रोजी सायंकाळी पिंकी या कामावरून घरी आल्यानंतर अर्जुन व त्याची मुले घरी होते. अर्जुनला घरी पाहत पिंकीने कामावर का गेला नाहीस असे विचारले. यावेळी अर्जुन रागाने घरा बाहेर गेला व त्यांनतर काही काळाने दारू पिऊन घरी आला आणि पिंकी सोबत भांडायला लागला. तू चांगली नाहीस असे पिंकीला म्हणून शिवीगाळ करू लागला. तर पिंकी जवळ असलेला आयुषला अर्जुनने हिसकावून आपल्या जवळ घेतले.

दरम्यान हा भांडणाचा आवाज ऐकत पिंकी याचा भाऊ व भावजय धावत घरी आले. त्यांनी अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु दारूच्या नशेत असलेला अर्जुनने कोणाची काही ऐकले नाही व आपल्याच मुलाला फरशीवर आपटून रक्त बंबळ केले. त्यानंतर घरच्या लोकांनी आयुषला उपचारासाठी कराड येथील रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news