सांगली : ऐतवडे बुद्रुकमध्ये सिलिंडरचा स्फोट

सांगली : ऐतवडे बुद्रुकमध्ये सिलिंडरचा स्फोट
Published on
Updated on

ऐतवडे बुद्रुक : पुढारी वृत्तसेवा

ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील मुमताज शब्बीर संदे यांच्या घरी सोमवारी दुपारी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये संदे यांच्या घराचे तसेच संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने आजूबाजूच्या घरांच्या भिंतीना तडे गेले. काही भिंती पडल्या. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

संदे कुटुंबियांसह दोन दिवस परगावी गेल्या होत्या. सोमवारी घरी आल्यानंतर स्वयंपाकासाठी सिलिेंडरचा कॉक सुरू करतानाअचानक आगीचा भडका झाला. त्याने रौद्ररुप धारण केले. प्रसंगावधान राखून सर्वांनी घरातून बाहेर पळ काढला. आगीची तीव्रता वाढली. त्यातच त्या सिलिंडरचा काही वेळाने स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर आग भडकली. घरातील साहित्य जळून खाक झालेे. स्फोटामुळे आजूबाजूच्या लोकांच्या घरांच्या भिंतीना तडे गेले.

ग्रामस्थांनी संदे यांच्या घराची भिंत पाडून पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. वर्धमान बुद्रुक, बाळासाहेब पाटील, अमोल कदम यांच्यासह युवकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. ग्रामसेवक दत्तात्रय कोेळी, तलाठी मकरंद आणेकर यांनी संदे यांच्या घराचा पंचनामा केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news