

जत; पुढारी वृत्तसेवा: पैसे न दिल्याच्या कारणावरून मुलाने पित्याचा खून केला. ही घटना आसंगी-जत (ता. जत) येथे बुधवारी (दि.२८) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
देवाप्पा खिराप्पा मोडे (वय ५५) खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रवीण देवाप्पा मोडे (वय २६) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद कस्तुरा मोडे यांनी उमदी पोलिसात दिली आहे. जत तालुक्यातील आठवड्यातील हा दुसरा खून आहे. या खूनामुळे तालुक्यातील नागरिक हादरले आहेत.
अधिक वाचा
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रवीण याला अटक केली.
हेही वाचलंत का?