

जत: पुढारी वृत्तसेवा : खंडनाळ (ता. जत) येथील एका मजुराचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे. सचिन सायप्पा कुळाळ (वय 26) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खंडनाळ येथील तरुणास येथीलच एकाने वाळू भरण्यास शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मजुरीवर घेऊन गेले होते. या कामावर असताना त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. कुळाळ हा तरुण वाळूच्या ढिगाऱ्याखाली अडकल्यानंतर तो जखमी झाला होता, अशी चर्चा आहे. पहाटे त्यास उपचारासाठी जत येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केल्यानंतर नातेवाईकानी संशय व्यक्त केला.
शनिवारी दिवसभर हा वाद सुरु होता. सायंकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. ज्यांनी त्यास कामावर नेले होते. तो संशयित आरोपी फरार झाल्याची चर्चा होती. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
हेही वाचा