ठाणे : राज्यातील 87 मतदारसंघ संवेदनशील असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगान म्हटले असून त्यामध्ये मुंबईतील 6, कोकणातील 10, पश्चिम महाराष्ट्रातील 18, उत्तर महाराष्ट्रातील 14, विदर्भातील 17, आणि मराठवाड्यातील 15 मतदारसंघांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर, शिरोळ आणि चंदगड हे तीन तर सांगलीत सांगली शहर हे मतदारसंघ संवेदनशील म्हणून घोषित झाले आहेत.
या सर्व मतदारसंघांत सशस्त्र पोलिस दलाच्या जादा तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत. कोकणातील सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी, कणकवली, पालघरमध्ये डहाणू, वसई, ठाण्यात भिवंडी पूर्व, मुरबाड, उल्हासनगर, डोंबिवली, ओवळा माजीवडा, ऐरोली, बेलापूर, ठाणे शहर हे मतदारसंघ संवेदनशील घोषित करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये वांद्रे पूर्व, कुर्ला, भांडुप पश्चिम, माहीम, मुंंबादेवी, कुलाबा, रायगडमध्ये पनवेल, कर्जत, उरण हे मतदारसंघ संवेदनशील आहेत. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरमध्ये सोलापूर शहर, उत्तर माळशिरस, पुण्यामध्ये खेड, आळंदी, शिरूर, दौंड, बारामती, मावळ, चिंचवड, पिंपरी वडगाव, वडगाव शेरी, शिवाजीनगर, पर्वती हडपसर आणि पुणे कॅन्टोमेंट हे मतदारसंघ संवेदनशील घोषित झाले आहेत.
कोल्हापूरमध्ये कोल्हापूर उत्तर, शिरोळ, चंदगड, सांगलीमध्ये सांगली शहर मतदारसंघ, नाशिक विभागात बागलाण, कळवण, दिंडोरी, नाशिक मध्य, इगतपुरी हे मतदारसंघ संवेदनशील आहेत. धुळ्यातील साक्री, धुळे शहर, शिरपूर, जळगावमध्ये चोपडा, जळगाव शहर, रावेर, नंदूरबारमध्ये अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार आणि नवापूर, बुलढाण्यात मलकापूर, चिखली, बुलडाणा, वर्ध्यामध्ये वर्धा; तर नागपूरमध्ये हिंगणा, नागपूर पूर्व, नागपूर मध्य हे मतदारसंघ संवेदनशील घोषित झाले आहेत.
भंडारामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोलीमध्ये गडचिरोली, चंद्रपूर, बल्लापूर, यवतमाळमध्ये अर्णी, नांदेडमध्ये किनवट, भोकर आणि डेगलूर, परभणीत जिंतूर, परभणी, जालना तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये कुलंब्री, संभाजीनगर मध्य आणि गंगापूर, लातूरमध्ये नीलंगा, औसा, धाराशिव, उमरगा, अहिल्यानगरमध्ये संगमनेर, नगर शहर हे संवेदनशील मतदारसंघ म्हणून घोषित करण्यात आले आहेत. हे मतदारसंघ प्रमुख नेत्यांची उमेदवारी असलेले आहेत.