सांगली : विभागीय आयुक्तांमार्फत विट्याच्या प्रांताधिकाऱ्यांच्या चौकशीचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आदेश

सांगली : विभागीय आयुक्तांमार्फत विट्याच्या प्रांताधिकाऱ्यांच्या चौकशीचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आदेश

विटा (सांगली), पुढारी वृत्तसेवा : विट्याचे उपविभागीय अधिकारी संतोष भोर यांची सखोल चौकशी करावी तसेच त्‍याच्याबद्‌दलचा अहवाल तात्काळ शासनास सादर करा, असा आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार संजय पाटील यांच्या तक्रारीनंतर पुणे विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, विटा आणि आटपाडी तालुक्याचे प्रांताधिकारी संतोष भोर हे भ्रष्टाचारी, उद्धट वर्तन, लोकांना अरेरावी करणे, विनाकारण कामात अडवणूक करणे आदी तक्रारी गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरू आहेत. सप्टेंबरमध्ये वकिलांच्या खटल्यांबाबत प्रांताधिकारी संतोष भोर हे मुद्दामहून वेळेत कामे करत नाहीत तर उलट वकिलांना योग्य वागणूक देत नाहीत. पक्षकारांच्या समोर वकिलांचा अवमान करतात असे आरोप त्‍यांच्यावर केले होते.

तसेच, आटपाडी वकील बार असोसिएशन आणि विटा वकील बार असोसिएशन या दोन्ही संघटनांनी स्वतंत्रपणे ठराव करून प्रांताधिकारी भोर यांच्या समोर खटले न चालविण्याचा निर्णय घेतला. तर काही नागरिकांनी याबाबतची माहिती खासदार संजय पाटील यांच्याकडे केली. यानंतर त्‍यानी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनाही असाच अनुभव आला.

यानंतर त्यांनी ११ नोव्हेंबर रोजी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीत खासदार पाटील यांनी प्रांताधिकारी भोर यांच्या तक्रारींची शहानिशा केली असता असाच अनुभव आला आहे, असे विखे पाटील म्‍हणाले.

प्रांताधिकारी भोर यांची खातेनिहाय चौकशी करावी आणि त्यांची तातडीने बदली करण्यात यावी याची मागणी करण्यात आली होती. आता या सर्वावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भोर यांच्या विरोधातील तक्रारींमध्ये नमूद मुद्यांच्या अनुषंगाने सखोल चौकशी करुन याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल अभिप्रायासह व आवश्यक त्या कागदपत्रासह तात्काळ शासनास सादर करण्यात यावा असे आदेश दिले आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news