

विटा; पुढारी वृत्तसेवा : खानापूर मतदारसंघातील रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ३६ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार अनिल बाबर यांनी दिली आहे.
आमदार बाबर म्हणाले, खानापूर मतदारसंघातील रस्त्यांची कामे मार्गी लागावीत, म्हणून आपण सातत्याने पाठपुरावा केला आहे. शिवाय ही कामे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार व्हावीत म्हणून प्रयत्नशील आहे. मतदारसंघातील जनतेला दिलेली सर्वांगीण विकासाची आश्वासने पूर्ण करण्यासाठी ताकदीने काम करीत आहे.
आता मतदारसंघातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी ते शेडगेवाडी रस्त्यासाठी ४ कोटी २७ लाख ९१ हजार रुपये, करगणी ते शेटफळे चिंध्यापीर रस्त्यासाठी ६ कोटी ६९ लाख ८३ हजार रुपये, खांजोडवाडी – बोंबेवाडी – पिंपरी खुर्द रस्त्यासाठी ४ कोटी २३ लाख रुपये, पिंपरी बुद्रुक ते घरनिकी ते वलवण रस्त्यासाठी ५ कोटी ५५ लाख रुपये, तर खानापूर तालुक्यातील भूड ते जाधववाडी ते खानापूर रस्त्यासाठी ७ कोटी ७८ लाख रुपये, चिंचणी (मं.) ते कार्वे ते खंबाळे (भा.) रस्त्यासाठी ४ कोटी ४५ लाख रुपये, जाधववाडी ते बलवडी (खा.) रस्त्यासाठी २ कोटी २७ लाख रुपये, रुपये, तासगाव तालुक्यातील पाडळी ते माळवाडी रस्त्यासाठी २ कोटी २९ लाख रुपये, रुपये असा एकूण ३६ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
ग्रामीण भागात दळवळणासाठी पक्क्या रस्त्यांची फार मोठी गरज आहे. खानापूर मतदारसंघातील रस्त्यांवरील वाहतूक, वर्दळ, गावांची संख्या, लोकसंख्या तसेच रस्त्यांचा एकूण होणारा वापर विचारात घेता, या रस्त्यांचे मजबूतीकरण व सुधारणा करणे गरजेचे होते. त्यामुळे या रस्त्यांची सुधारणा व्हावी यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता.त्यातून हा निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य लाभल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले.
अधिक वाचा :