

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : माणदेशी साहित्याची पताका जगभर फडकवणाऱ्या डॉ. शंकरराव खरात यांचे स्मारक आटपाडी येथे होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी केले. डॉ. खरात यांच्या २३ व्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. शंकरराव खरात प्रतिष्ठानचे सचिव विलास खरात, माडगुळेचे सरपंच विठ्ठल गवळी, आटपाडीचे माजी उपसरपंच विलास नांगरे, अरुण वाघमारे आदी उपस्थित होते.
माजी आमदार देशमुख यांनी साहित्यिक क्षेत्रात डॉ.खरात यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. खरात आणि महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन झाले. स्वागत प्रास्ताविकात विलास खरात यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. तसेच डॉ. खरात यांचे स्मारक लवकर उभे राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी लक्ष्मण मोटे यांनी सामुदायिक वंदना घेतली. विजय देशमुख, अरविंद चांडवले, शिवाजी माळी, जयंत नेवासकर, वसंत विभूते, नारायण जावीर, सुखदेव गळीग, बाबा खरात आदी उपस्थित होते. रोहन खरात यांनी आभार मानले.
हेही वाचा