या शेतकऱ्याने केली हवा…एका एकरात १०० टन खोडवा | पुढारी

या शेतकऱ्याने केली हवा...एका एकरात १०० टन खोडवा

बागणी; पुढारी वृत्तसेवा : एकीकडे एकरी उसाचा उतारा घटत असताना तुंग येथे प्रयोगशील शेतकरी विनोद तोडकर यांनी अवघ्या एक एकरात तब्बल 100 टन खोडवा उसाचा उतारा घेतला आहे. पूर्णपणे केलेल्या व्यावसायिक व्यवस्थापनाचे हे यश असल्याची प्रतिक्रिया तोडकर यांनी व्यक्त केली.

तोडकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध पिके, भाजीपाला तसेच प्रामुख्याने ढोबळी मिरचीच्या विक्रमी उत्पादनासाठी नाव कमावले आहे. तुंग येथे त्यांची शेती आहे. या ठिकाणी त्यांनी को – 86032 या ऊस वाणाचा बियाणे प्लॉट केला होता. या प्लॉटमधील ऊस बियाणासाठी मागील हंगामात तुटून गेला. त्यानंतर तोडकर यांनी येथे खोडवा ठेवला. पाण्याची सोय ठिबकने केली होती. तसेच खते, विविध आणि वेळेवर केलेल्या फवारण्या यामुळे त्यांनी खोडवा पीक जोमदार आणले. तसेच यासाठी त्यांनी पोखर्णी येथील अशोका अ‍ॅग्रो फर्ट यांची सेंद्रीय खते वापरली.

प्रामुख्याने लिंबोळी पेंड, मासळी खत तसेच करंजी पेंड त्यांनी पुरेशा प्रमाणात वापरली असल्याचे सांगितले. दहा बारा दिवसांपूर्वी या उसाची तोड सुरू झाली आहे. एकरी 100 टनाचा उतारा मिळाला असल्याचे तोडकर यांनी सांगितले. ते म्हणाले, शेतकर्‍यांनी उसासाठी पाणी, खते यांचा मनमानी वापर न करता योग्य प्रमाणातच करावा तसेच पाचट न पेटविता शेतातच कुजविण्याचा सल्ला त्यांनी दिला.

हेही वाचलत का?

Back to top button