nagpur corona : विदेशातून आलेल्या तिघांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह, जिनोम सिक्वेसिंग साठी पाठवले नमुने | पुढारी

nagpur corona : विदेशातून आलेल्या तिघांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह, जिनोम सिक्वेसिंग साठी पाठवले नमुने

नागपुर; पुढारी वृत्तसेवा

ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता गेल्या महिनाभरात परदेशातून नागपूरात प्रवास करून आलेल्या १७५ प्रवाशांमधील तीन प्रवाशांच्या करोना चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील एक रुग्ण पश्चिम आफ्रिकेतून तर उर्वरीत दोघे हे युनायटेड किंग्डममधून नागपुरात परतले. या सर्व प्रवाशांचे अहवाल जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ब्युरो ऑफ इमिग्रेशनने महापालिकेला पाठवलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यात विदेशातून नागपुरात १७५ प्रवासी आले होते. या सर्वांच्या चाचण्या करण्यात आल्या. तसेच त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

सोमवारी यातील एक ४५ वर्षीय महिला, तिची नऊ वर्षीय मुलगी आणि एका पुरुषाची चाचणी पॉझिटिव्ह आली.दरम्यान, गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढल्याने जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या ८१ पर्यंत वाढली आहे. मंगळवारी दिवसभरात नागपूर जिल्ह्यात १९ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली. तर सहा रुग्ण करोनामुक्त झाले.

हेही वाचा

Back to top button