थंडीची चाहूल, अंडी शेकड्यामागे १५० रुपयांनी महागली | पुढारी

थंडीची चाहूल, अंडी शेकड्यामागे १५० रुपयांनी महागली

नवी मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईत हैद्राबाद, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून अंडी विक्रीसाठी घाऊक व्यापारी मागवतात. यावर्षी अंड्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्याने बाजारभाव 100 अंड्यांमागे गेल्या वर्षाच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये 110 रुपयांनी घसरला होता. मात्र डिसेंबरमध्ये थंडीची चाहूल लागताच अंड्याच्या दरात मोठी वाढ झाली. घाऊक बाजारात 100 अंड्यांमागे 50 रुपये तर किरकोळला 150 रुपयांनी वाढ झाली आहे.

नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर अंडी विक्रीत घट झाली होती. मुंबईतील अंड्यांची दररोजची होणारी विक्री 35 लाख अंड्यांनी घटली होती. मात्र आता डिसेंबरमध्ये थंडी सुरु होताच दररोजच्या विक्रीत 40 लाखांनी वाढ होऊन 78 लाखांवर गेल्याची माहिती मुंबई एग्ज असोसिएशनचे अध्यक्ष अफताब खान यांनी दिली. 20 ते 25 डिसेंबरपर्यंत हे दर असेच कायम राहतील.गेल्या वर्षी कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर किरकोळ विक्रेत्यांकडून अंडीला मागणी होती.

दररोज 80 ते 90 लाख अंड्यांची विक्री केली जात होती. मात्र आता चालू वर्षात नोव्हेंबरमध्ये ही विक्री 45 लाखांवर आली होती. किरकोळ विक्रेत्यांकडून होणार्‍या विक्रीत मोठ्या प्रमाणावर घट झाली होती. त्याचा परिणाम घाऊक व्यापारावरही झाला होता. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये अंडी विक्री 35 लाखावर येऊन ठेपली होती. शिवाय 100 अंड्यांचा दरही गेल्या वर्षांच्या तुलनेत 110 रुपयांनी घसरला होता.

यामागील कारण म्हणजे अंड्यांचे े विक्रमी उत्पादन झाल्याने त्याचा फटका आणि मागणीत घसरण ही प्रमुख कारणे होती. 2020मध्ये नोव्हेंबरच्या अखेर घाऊकला 570 तर किरकोळ 840 रुपये शेकडा असा दर होता. आज पुन्हा अंड्याच्या दरात आणि विक्रीत मोठी वाढ झाली असल्याचे मुंबई एग्ज असोसिएशनचे अध्यक्ष आफताब खान यांनी सांगितले.

Back to top button