पणजी : पाटील-आवटे विवाह सोहळा थाटामाटात | पुढारी

पणजी : पाटील-आवटे विवाह सोहळा थाटामाटात

पणजी ; पुढारी वृत्तसेवा : माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू व डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील आणि वैजयंती पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज यांचा शुभविवाह चि.सौ.कां. वृषाली (प्रा. अजय आवटे आणि विभावरी आवटे (अमरावती) यांची सुकन्या) यांच्याशी गोव्यातील वागातोर समुद्रकिनारी पंचतारांकित हॉटेल डब्ल्यू येथे मंगळवारी मोठ्या थाटामाटात पार पडला.

वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी कोल्हापूरचे शाहू महाराज, डॉ. डी. वाय. पाटील, दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, दै. ‘पुढारी’चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव, दै. ‘पुढारी’च्या संचालिका सौ. स्मितादेवी योगेश जाधव, चिरंजीव तेजराज योगेश जाधव, सौ. शांतादेवी डी. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे (पुणे) कुलपती डॉ. पी. डी. पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, माजी आमदार मालोजीराजे, सौ. मधुरिमाराजे, यशराजराजे, उद्योगपती डॉ. संजय घोडावत, उद्योजक रोफ धनानी, शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी. पी. साबळे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्रतापराव चव्हाण-पाटील, मेघराज काकडे, प्रदीप पालशेतकर, डॉ. विजय डी. पाटील, डॉ. अजिंक्य डी. पाटील, अ‍ॅड. धैर्यशील पाटील, अनिलराव मोरे, देवराज पाटील, व्ही. बी. पाटील, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदेचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्‍ता, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर, प्रा. अजय आवटे, सौ. विभावरी आवटे, अनिकेत आवटे यांच्यासह पाटील कुटुंबीय, विविध शिक्षण संस्थांचे प्रमुख पदाधिकारी, सामाजिक, राजकीय व उद्योग क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, सौ. वैजयंती संजय पाटील, ग्रुपचे उपाध्यक्ष गृह राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज डी. पाटील, विश्‍वस्त आमदार ऋतुराज पाटील व कुटुंबीयांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

Back to top button