Sangli Murder : सांगलीत लाथाबुक्यांनी मारहाण करून तरुणाचा खून | पुढारी

Sangli Murder : सांगलीत लाथाबुक्यांनी मारहाण करून तरुणाचा खून

सांगली : पुढारी वृत्तसेवा : Sangli Murder : येथील लव्हली सर्कल ते मंगळवार बाजारच्या आतील रस्त्यावर फिरोज शेरअली शेख वय ४० ( रा. शिंदेमळा, मुळ गाव मिरज) याचा तिघांनी मिळून लाथाबुक्यांनी मारहाण करून खून केला. याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिरोज हा शिंदेमळा येथे त्याच्या सासुरवाडीत राहतो. त्याचे मुळगाव मिरज आहे. त्याला दारूचे व्यसन होते. मंगळवारी रात्रीही तो दारूच्या नशेत होता.

त्याचवेळी त्याच्या ओळखीच्या लोकांनीच त्याच्याशी वाद झाल्यावर त्याला लाथाबुक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. बुधवारी पहाटे जखमी अवस्थेत त्याला वसंतदादा रूग्णालयात दाखल केले असता तो मयत आढळून आला. Sangli Murder)

संजयनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून त्याच्याबरोबर असणाऱ्यांचा शोध सुरु केला आहे.

अशी माहिती संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय श्रीरसागर यांनी दिली.

Back to top button