Sangli : सोनहिरा कारखान्यास “ बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ कोजनरेशन प्लँट” पुरस्कार जाहीर : मोहनराव कदम | पुढारी

Sangli : सोनहिरा कारखान्यास “ बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ कोजनरेशन प्लँट” पुरस्कार जाहीर : मोहनराव कदम

कडेगाव: पुढारी वृत्तसेवा : वांगी (ता.कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या कोजनरेशन प्रकल्पाला भारतीय शुगर यांच्याकडून “बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ कोजनरेशन प्लँट” पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी दिली. Sangli

मोहनराव कदम म्हणाले की, मागील दोन वर्षांमध्ये कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ठ कोजनरेशन प्रकल्पाचा सलग दोन वेळा पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील बेस्ट कोजनरेशन पॉवर प्लँट पुरस्कार, बेस्ट कोजनरेशन पॉवर प्लँट विशेष पुरस्कार, बेस्ट कोजनरेशन मॅनेजर पुरस्कार, बेस्ट डी.एम.प्लँट मॅनेजर पुरस्कार आणि यावर्षी भारतीय शुगर यांचेकडून “बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ कोजनरेशन प्लँट” तसेच महाराष्ट्र शासनाकडून एनर्जी कॉन्झरवेशन पुरस्कार, बेस्ट बॉयलर युजर्स् पुरस्कार असे विविध पुरस्कार मिळाले आहेत. पुरस्कार मिळविणारा सोनहिरा कारखाना हा देशातील एकमेव कारखाना ठरला आहे.

कारखान्याकडील कोजनरेशन प्रकल्प उत्कृष्ठ पध्दतीने सुरु आहे. प्रकल्पामध्ये विविध प्रकारच्या नवनवीन तांत्रिक संकल्पना राबविले जातात. जास्तीत जास्त कार्यक्षमता मिळविली आहे. कमी इंधनामध्ये जास्त वीज निर्मिती व ऊर्जा बचत केलेली आहे. या उल्लेखनीय कामकाजाची दखल घेवून “बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ कोजनरेशन प्लँट” पुरस्कार सोनहिरा कारखान्याला मिळाल्याचे भारतीय शुगरकडून कळविण्यात आले आहे.

सहवीज निर्मिती प्रकल्प उत्कृष्ठ कार्यक्षमतेने चालविण्याचे व्यवस्थापन कोजन मॅनेजर नवनाथ सपकाळ यांनी केले आहे. त्यासाठी कार्यकारी संचालक शरद कदम यांनी कुशल मार्गदर्शन केले आहे.

हेही वाचा 

Back to top button