सांगली झाली भगवी; रामभक्तांमध्ये उत्साह | पुढारी

सांगली झाली भगवी; रामभक्तांमध्ये उत्साह

सांगली; पुढारी वृत्तसेवा : भगवे ध्वज, भगव्या पताका लेवून अवधी सांगलीनगरी भगवी झाली आहे. रामभक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. आजपासून पुढचा आठवडाभर सांगलीत प्रभू श्रीरामाची महती सांगणारे विविध कार्यक्रम आहेत.

रामभक्त आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांनी घरोघरी जाऊन अयोध्येतील अक्षतांचे वाटप केले आहे. सोमवारी, २२ जानेवारीला दिवाळीसारखा सण साजरा करण्याचे आवाहनही केले आहे. सांगली शहरामधील प्रत्येक चौक भगवे ध्वज, भगव्या पताका, प्रभू रामाच्या प्रतिमांनी सजले आहेत. टिळक चौक, गावभाग, राम मंदिर चौक, गणपती पेठ, बालाजी चौक, मास्ती रोड, रतनशीनगर, सराफ कट्टा, विश्रामबाग चौक, मध्यवर्ती बसस्थानक परिसर भगव्या ध्वजांनी रंगला आहे. सांगलीसह उपनगरांमधूनही मोठा उत्साह आहे. अनेक अपार्टमेंटस् आणि घरांवर रामभक्तांनी भगवे ध्वज, पताका आणि रामाचे मोठमोठे डिजिटल्स लावले आहेत. विश्रामबागच्या स्त्री सखी महिला मंडळाने मंडळात श्रीराम व अक्षता कलशाची पूजा करून पाच रामरक्षेचे पाठ केले. मंडळापासून एसटी कॉलनीतील राममंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. ज्येष्ठ महिला लेझीम खेळत व रामनामाचा गजर गजर करत सहभागी झाल्या होत्या यावेळी प्रसाद वाटप झाले.

या मंगलसोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी संस्कार भारती सांगली जिल्हा समितीने राम रंगी रंगले… या चित्र-शिल्प-रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यामध्ये सांगलीतील ३० हूनही जास्त कलाकार प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनातील अनेक प्रसंग रेखाटणार आहेत. सुंदर रांगोळी, चित्रकला आणि शिल्पकला यांचे प्रात्यक्षिक आयोजिले आहे. प्रदर्शनाचे उ‌द्घाटन पी.एन.जी. ज्वेलर्सचे संचालक सिद्धार्थ गाडगीळ यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शन २२ रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत बापट बाल शिक्षण मंदिर येथे सर्वांसाठी खुले राहणार आहे. प.पू. श्रीसद्‌गुरू तात्यासाहेब कोटणीस महाराज यांच्या शंभराव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त कैवल्यधाम येथे २२ ते ३१ जानेवारीदरम्यान विविध मान्यवरांची प्रवचने, कीर्तन, गायन, व्याख्यान,

तसेच दीपोत्सव आहे. ही माहिती शताब्दी पुण्यतिथी महोत्सव स्वागत समितीचे उपाध्यक्ष ह.भ.प. गुरुनाथ कोटणीस, गणेश गाडगीळ यांनी दिली. उत्सव काळात २२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिर अयोध्या येथील प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सकाळी ११ ते १ या वेळेत आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ३१ रोजी पाच वाजता मंदिरावर पुष्पवृष्टी होणार असून, रात्री ७ वाजता दीपोत्सव
होणार आहे. मिरजेत मंदिराची प्रतिकृती

शताब्दी पुण्यतिथी महोत्सव स्वागत समितीचे उपाध्यक्ष ह.भ.प. गुरुनाथ कोटणीस, गणेश गाडगीळ यांनी दिली. उत्सव काळात २२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिर अयोध्या येथील प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सकाळी ११ ते १ या वेळेत आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ३१ रोजी पाच वाजता मंदिरावर पुष्पवृष्टी होणार असून, रात्री ७ वाजता दीपोत्सव होणार आहे. मिरजेत मंदिराची

शताब्दी पुण्यतिथी महोत्सव स्वागत समितीचे उपाध्यक्ष ह.भ.प. गुरुनाथ कोटणीस, गणेश गाडगीळ यांनी दिली. उत्सव काळात २२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिर अयोध्या येथील प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सकाळी ११ ते १ या वेळेत आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ३१ रोजी पाच वाजता मंदिरावर पुष्पवृष्टी होणार असून, रात्री ७ वाजता दीपोत्सवहोणार आहे.

Back to top button