सांगली : ऐतवडेत मगरीचा वावर शेतवस्तीपर्यंत वाढला | पुढारी

सांगली : ऐतवडेत मगरीचा वावर शेतवस्तीपर्यंत वाढला

ऐतवडे खुर्द ; पुढारी वृत्तसेवा

जुलै महिन्यात वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे मगरीचे वास्तव्य आजही शेतवस्तीत असल्याचे दिसून येत आहे. ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे मगरींचा वावर एका ठिकाणी आसरा घेतल्याचे दिसून आल्याचे शेतकर्‍यांनी सांगितलेे.

जुलै महिन्यात वारणा नदीला महापूर आला होता. महापुराचे पाणी पसरल्याने मगरीने अनेक ठिकाणी वास्तव्य केले होते. ऐतवडेतील गायकवाड मळ्याशेजारी बी. एस. पाटील यांची शेतवस्ती आहे. या ठिकाणी महापुराचे पाणी आले होते. या दरम्यान या ठिकाणी मगरी निदर्शनास आल्या होत्या. यावेळी पाणी गेल्यानंतर या परिसरात मगरीचे लहान पिलू आजही वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले.

सध्या मगरीचे लहान पिलू अंदाजे चार ते पाच फूट लांबीचे आहे. या ठिकाणी बांधीव विहिरीचा आसरा घेतला आहे. या ठिकाणी बी. एस. पाटील यांची वस्ती आहे. त्यामुळे वनविभागाने या मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील शेतकर्‍यांकडून होत आहे.

हेही वाचलत का?

Back to top button