सांगली : खंडणीच्या गुन्ह्यातील संशयितास अटक

पाच हजार रुपयांची खंडणी मागणार्या रतन रमेश कांबळे (वय 36, रा. नवीन वसाहत, टिंबर एरिया) या संशयितास अटक केली. विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हा मागे घेण्यासाठी कांबळे हा फिर्यादी अंकुश विजय पाटील याला जीवे मारण्याची धमकी देत होता.
पोलिसांनी सांगितले, अंकुश पाटील याच्या येथील कॉलेज कॉर्नरवरील एका पान शॉप येथे महिनाभरापूर्वी रतन कांबळे आणि त्याचा मित्र पवन बुचडे गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी पाच हजार रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास मारण्याची धमकी दिली. त्यानंतर याबाबत अंकुशने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. कांबळे विरोधात गुन्हा दाखल झाला. त्याच्या विरोधात मारामारी, धमकावणे आदी प्रकारचे आठ गुन्हे दाखल आहेत.
याप्रकरणी पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो सापडत नव्हता. तो फिर्यादी अंकुश पाटील याच्याकडे गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत होता. माझ्या बाजूने न्यायालयात म्हणणे सादर केले नाही तर तुला ठार मारेन, अशी धमकी त्याने दिली होती. रतन हा पत्नीला भेटण्यासाठी येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्याला पकडले. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमित पाटील, अनिल ऐनापुरे, आदिनाथ माने, स्वप्निल कोळी, सर्जेराव पवार, दरिबा बंडगर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. सहायक पोलिस निरीक्षक अनिल ऐनापुरे तपास करीत आहेत.
हेही वाचलत का?
- विधान परिषद निवडणूक : अमल महाडिक आज उमेदवारी अर्ज भरणार
- शिक्षकांच्या अर्हतावाढीला लाल फितीचा अडसर
- हार्दिक पांड्या याला दक्षिण आफ्रिका दौर्यातही संधी मिळण्याची शक्यता कमी
Clinical Depression : क्लिनिकल डिप्रेशन म्हणजे नेमकं काय? (भाग-२) https://t.co/6fytIqz7dF #ClinicalDepression #pudharionline
— Pudhari (@pudharionline) November 22, 2021