SANGALI DCC bank : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी चुरशीने मतदान | पुढारी

SANGALI DCC bank : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी चुरशीने मतदान

सांगली ; पुढारी वृत्तसेवा

पलूस – सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (SANGALI DCC bank) निवडणुकीसाठी रविवारी झालेल्या पलूस मतदान केंद्रावर १८९ पैकी १८४  मतदान केले. तालुक्यात एकूण  ९७.३५ % इतके मतदान झाले. सोसायटी मतदार संघातून महा विकास आघाडीच्या सहकार विकास पॅनेलचे उमेदवार महेंद्र लाड यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली. आज प्रत्यक्ष मतदानादिवशी येथील किर्लोस्कर विद्यालय पलूस येथील मतदान केंद्रावर सकाळपासूनच चुरशीने मतदान झाले.

दरम्यान, सकाळच्या सत्रात सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड, भाजपचे सत्यजित देशमुख, सतीश देशमुख यांनी पलूस मधील मतदान  केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी पलुस तालुका समन्वय अध्यक्ष महेंद्र लाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष विशाल पाटील, गटनेते शरद लाड, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर, सत्यजित बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, सद्स्य व व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद संदीप पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया एकदम शांततेत पार पडली. (सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक)

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सकाळी उत्साहात प्रारंभ झाला. सांगलीतील महापालिकेच्या शाळा क्रमांक 1 मध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला. सकाळीच कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी मतदान केंद्राला भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी उमेदवार जयश्री पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, डॉ. जितेश कदम, युवक राष्ट्रवादीचे नेते शरद लाड, राष्ट्रवादीचे संजय बजाज, महापौर दिग्विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी जिल्हा बँकेत विकास महाआघाडीचे पॅनेल मोठ्या फरकाने विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला. (सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक)

(SANGALI DCC bank)भाजपच्या वतीने आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील यांनी सांगली शहरातील मतदान केंद्राला भेट देऊन मतदारांशी संवाद साधला. जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सरचिटणिस सुरेंद्र चौगुले यांनी जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी देशमुख यांनी भाजपप्रणित शेतकरी विकास पॅनेल जोरदार मुसंडी मारेल, असा विश्वास व्यक्त केला.

तालुकानिहाय मतदान केंद्रे व कंसात मतदार असे

आटपाडी- जि.प. प्राथमिक  शाळा क्रमांक 1 बसस्थानकासमोर (160), कवठेमहांकाळ : जि.प. मराठी मुलांची शाळा क्रमांक 2 (172), विटा : लोकनेते हणमंतराव पाटील प्राथमिक विद्यामंदिर (132), जत : जि.प. प्राथमिक मराठी शाळा  क्रमांक 3 (189), तासगाव:  चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर (234), मिरज: आदर्श शिक्षण मंदिर किल्ला परिसर (166), इस्लामपूर: इस्लामपूर हायस्कूल खोली क्रमांक 12 (297) आणि खोली क्रमांक 14 (235), शिराळा: न्यू इंग्लिश स्कुल (212), पलूस : लक्ष्मणराव  किर्लोस्कर विद्यामंदिर (189), कडेगाव:  जि.प. मराठी मुलांची शाळा क्रमांक 2(151), सांगली: महापालिका प्राथमिक मराठी मुलांची शाळा क्रमांक 1 (436). (सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक)

मिरजेतील केंद्रावर पूर्व भागातील मतदारांची मतदान व्यवस्था केली आहे. तर सांगलीतील केंद्रावर मिरज पश्चिम भागासह शहराजवळील मतदारांची सोय केली आहे. इस्लामपुरात खोली क्रमांक 12 मधील केंद्रावर सोसायटी गट व इतरशेती संस्थामधील मतदारांची व्यवस्था केली आहे. तर खोली क्रमांक 14 मधील केंद्रावर कृषी पणन व प्रक्रिया संस्था, नागरी बँका व पतसंस्था गट, मजूर सोसायटी गटातील मतदारांची व्यवस्था केली आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button