विधान परिषद निवडणूक : अमल महाडिक आज उमेदवारी अर्ज भरणार

विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक सोमवारी (दि.22) सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी अकरा वाजता हॉटेल पंचशील येथे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी एकत्र जमणार आहेत. येथून ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहेत.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, आ. विनय कोरे, आ. प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी खासदार धनंजय महाडिक, तसेच जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचलं का ?
- रिव्हाइज्ड रिटर्न दाखल करताय?, तर ही माहिती वाचाच…
- अग्रलेख : ‘जीवघेणी’ राजधानी
- हार्दिक पांड्या याला दक्षिण आफ्रिका दौर्यातही संधी मिळण्याची शक्यता कमी