विटा : पुढारी वृत्तसेवा : सूर्यनारायणाच्या साक्षीनं उगवलेली सोन सकाळ, सर्वत्र भगवे ध्वज अन टोप्या परिधान केलेला हजारोंचा जनसमुदाय आणि कोल्हापूरचे शाहीर दिलीप सावंत आणि सहकाऱ्यांनी चेतवल्यामुळं निर्माण झालेले चैतन्य अशा एकूणच वातावरणात मराठा आरक्षण प्रणेते मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला सांगली जिल्ह्यातील पहिल्या सभेला विट्यात सुरुवात झाली. (Manoj Jarange-Patil)
जेमतेम ८ बाय १० फुटाचे व्यासपीठ, त्यावर सिंहासनाधीष्ठित छत्रपती शिवरायांची मोठी मूर्ती आणि फक्त लढ म्हण, या घोषवाक्यासह मनोज जरांगे यांची ५ बाय १५ फुटी प्रतिमा असलेला फलक. "कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज की जय",' एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी" या घोषणांच्या जयघोषात शाहीर दिलीप सावंत यांनी पोवाड्याला सुरुवात केली. शाहीर दिलीप सावंत यांनी गायलेल्या या पोवाड्यातील वाक्या-वाक्या नंतर लोकांत उसळलेल्या त्वेषाच्या लाटा अशा एकूणच परिस्थितीत विट्यातील मनोज जरांगे पाटील यांची सभा सुरू झाली.
हेही वाचा