विट्याच्या कलाकारांच्या लघू चित्रपटास चेन्नईतील फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार | पुढारी

विट्याच्या कलाकारांच्या लघू चित्रपटास चेन्नईतील फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार

विटा ; पुढारी वृत्तसेवा

विटा (जि.सांगली) येथील कलाकारांचा समावेश असलेल्‍या “इनव्हिजिबल साईड (Invisible side) या भारतीय लघुचित्रपटास चेन्नई येथे झालेल्या ग्रास रूट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये ‘बेस्ट चिर्ल्डन्स शॉर्ट फिल्म ‘ पुरस्कार मिळाला. तब्बल १९ देशांतील २५० लघुचित्रपट या फेस्टिवलमध्ये प्रदर्शित करण्यात आले.

देशपातळीवरील ग्रास रूट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या वर्षी ऑक्टोबर महिन्यात चेन्नई येथे घेण्यात आला. या फिल्म फेस्टिवल मध्ये एकूण १९ देशांतील २५० लघुचित्रपट प्रदर्शित करण्यात आले. यापैकी ८५ लघुचित्रपटांना वेगवेगळ्या विभागांमध्ये पुरस्कार देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने बेस्ट एक्सपेरिमेंटल शॉर्ट फिल्म, बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म, बेस्ट म्युझिक व्हिडिओ, बेस्ट शॉर्ट स्क्रिप्ट-स्क्रिन प्ले, बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म इत्यादी कॅटेगरीमध्ये पुरस्कार देण्यात आले.

भारतासह अमेरिका, कॅनडा, बल्गेरिया, ब्राझील,जपान, ग्रीस आदी देशांच्या शॉर्ट फिल्‍म दाखवण्यात आल्या. यात भारतातील “इनव्हिजिबल साईड” (Invisible side) या भारतीय लघुचित्रपटास “बेस्ट चिर्ल्डन्स शॉर्ट फिल्म” पुरस्कार मिळाला. या लघुचित्रपटात विटा (जि. सांगली) येथील तौसिफ़ नौशादभाई शेख याने प्रमुख भूमिका साकारली आहे. सोबत डॉ. स्वाती अनिल पवार आणि बाल कलाकार माऊली गायकवाड या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. या लघुचित्रपटचे निर्माते दिग्दर्शक संदीप पवार (मुंबई) आहेत. संदीप पवार यांच्या या पुर्वी दोन लघुपटांनाही आंरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

Back to top button