सांगली : लेंगरे येथील एकास बोगस धनादेश प्रकरणी शिक्षा | पुढारी

सांगली : लेंगरे येथील एकास बोगस धनादेश प्रकरणी शिक्षा

विटा : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील लेंगरे येथील एकास बोगस धनादेश प्रकरणी दंड आणि शिक्षा विटा न्यायालयाने ९ टक्के व्याजाने रक्कमेचा परतावा देण्याची शिक्षा सुनावली आहे. वादी पक्षाच्या वतीने ॲड. विजय जाधव आणि ॲड. सुरज बाळासोा शिंदे यांनी काम पाहिले.

याबाबतची माहिती अशी की, संदिप शशिकांत जाधव यांनी यश कन्स्ट्रक्शनच्या वतीने भागीदार अमोल बबन मोहिते (रा. बोबडेवाडी, लेंगरे) यांना सिमेंट खरेदीसाठी दिला होता. परंतु, त्यांनी सिमेंट दिले नाहीच, पण दिलेला धनादेश ही त्यांच्या खात्यावर पुरेशी रक्कम नसल्यामुळे तो वटला नाही. अशाप्रकारे अमोल मोहिते यांनी संदिप जाधव यांची फसवणूक केली होती. म्हणून संदीप जाधव यांनी विटा न्यायालयात धाव घेत फसवणुकीचा खटला दाखल केला होता. या खटल्याचा निकाल आता आला आहे.

विट्याचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. सोनटक्के यांनी अमोल मोहिते यांना रोख रक्कम रुपये २ लाख ९७ हजार ५०० चा धनादेश दिल्या पासूनच्या तारखेपासून ९ टक्के व्याजासह नुकसान भरपाई वादी संदिप जाधव यांना देण्याचा आणि रक्कम न दिलेस दोन महिने साधी कैद असा आदेश दिला आहे. संदिप जाधव यांच्यावतीने ॲड. विजय जाधव आणि ॲड. सुरज शिंदे काम पाहिले.

हेही वाचा : 

Back to top button