Maratha Andolan : सांगली-फलटण महामार्गावर टायर पेटवून निषेध

Maratha Andolan : सांगली-फलटण महामार्गावर टायर पेटवून निषेध

विटा; पुढारी वृत्तसेवा : सांगली-फलटण महामार्गावर गार्डी (ता. खानापूर) येथे मराठा आरक्षणासाठी आज (दि.४) टायर पेटवून सरकारचा निषेध करण्यात आला. 'एक मराठा, लाख मराठा, जय भवानी- जय शिवाजी, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, आरक्षण द्या नाहीतर खुर्च्या खाली करा,' अशी घोषणाबाजी करत जालन्यात लाठीचार्जचा आदेश देणाऱ्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी करण्यात आली.

जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्ज घटनेचा राज्यभर तीव्र निषेध केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गार्डी येथे फलटण ते सांगली राज्य महामार्गावर टायर पेटवून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात राहुल बाबर, सौरभ बाबर, अजित बाबर, उपसरपंच विक्रम बाबर, बालाजी बाबर, कुलदीप बाबर, ऋतुराज बाबर, विशाल साळुंखे, प्रदीप कुंभार, हर्षवर्धन पाटील, सुशांत चव्हाण यांच्यासह शेकडो तरुण सहभागी झाले होते.

हेही वाचा : 

logo
Pudhari News
pudhari.news