लाठीचार्ज करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना मराठवाड्यात बंदी घाला : राज ठाकरे

लाठीचार्ज करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना मराठवाड्यात बंदी घाला : राज ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : "मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, हे मी आधीच बोललो होतो. मतांसाठी राजकारणी आरक्षणाच गाजर दाखवतात. लाठीचार्ज करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना मराठवाड्यात बंदी घाला, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी या आंदोलनस्थळी राज ठाकरे यांनी आज (दि.४) भेट दिली. त्यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

राज ठाकरे यांच्यासोबत यावेळी अमित ठाकरे देखील उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून मराठा आरक्षणाबाबत चर्चा करणार असल्याचे अश्वासन दिले. जेव्हा मोर्चे निघाले होते तेव्हाच मी म्हटलं होतं की मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. राजकारणी तुमचा वापर करून घेतील आणि नंतर दुर्लक्ष करतील. कायदेशीर माहिती समजून घ्या. पोलिसांना आदेश कुणी दिले त्यांना दोष द्या. पोलिसांना जे आदेश दिले ते त्यांना करावेच लागणार. सतत तुमच्यासमोर आरक्षणाच, पुतळ्यांच राजकारण करायचं आणि मते मिळवायची आणि पुन्हा वाऱ्यावर सोडून द्यायचं. ज्या लोकांनी गोळ्या चालवल्या लाठ्या मारायला लावल्या त्यांना माफी मागत नाही तोपर्यंत मराठवाड्यात बंदी घाला. मी राजकारण करायला आलो नाही. मी लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांशी बोलेन, जर प्रश्न सुटणार असेल तर नक्की सोडवू. पण या राजकारण्यांसाठी आपला जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news