जालना : मनोज जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीवरून महत्वाची अपडेट | पुढारी

जालना : मनोज जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीवरून महत्वाची अपडेट

जालना ; पुढारी वृत्‍तसेवा अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार्‍या मनोज जरांगे-पाटील यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य तपासणी केली. जरांगे-पाटील यांचा बीपी थोडा कमी झाला आहे. तसेच घसा कोरडा पडला असल्याचे तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्‍यान मनोज जरांगे पाटलांची तब्येत स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्या ते उपोषण स्थळीच आहेत. ते आपल्‍या आंदोलनावर ठाम आहेत.

काल (रविवार) सायंकाळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजप आमदार नितेश राणे, आमदार मंगेश चव्हाण यांनी त्‍यांची भेट घेतली. आरक्षणाबाबत दोन्ही बाजूंनी जवळपास दोन तास चर्चा झाली. मात्र कसलाही तोडगा निघू न शकल्यामुळे चर्चा निष्फळ ठरली. यानंतर जरांगे-पाटील आंदोलनावर ठाम राहिले. दोन दिवसांत मराठा आरक्षण मिळावे आणि लाठीमार करणार्‍या सर्व पोलिसांना बडतर्फ करावे, अशा मागण्या त्यांनी सरकारकडे केल्या आहेत.

उपोषण मागे घ्यावे, यासाठी मंत्री महाजन सायंकाळी उपोषणस्थळी आलेे. चर्चेदरम्यान जरांगे यांनी कुणबी व मराठा हे एकच आहेत, यासंबंधी असणारा जीआर लागू करावा, दोन दिवसांत तसा आदेश काढावा, अशी मागणी महाजनांकडे केली. त्यावर महाजन आणि राणे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : 

Back to top button