सांगली : मिरजेत १३ दुचाकींसह अट्टल चोरट्यांना अटक | पुढारी

सांगली : मिरजेत १३ दुचाकींसह अट्टल चोरट्यांना अटक

मिरज; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून दुचाकी चोरून ती स्वस्तात विक्री करणार्‍या दोघा चोरट्यांना शुक्रवारी (दि.२८) मिरज शहर पोलिसांनी अटक केली.  रणजीत श्रीरंग लोखंडे (वय २५, रा. मल्हारवाडी, मंगसुळी, जि. बेळगाव) आणि संजू आण्णाप्पा वालेकर (वय २६, रा. सावळज, ता.तासगाव) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ६ लाख २५ हजार रुपये किंमतीच्या १३ दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती मिरज शहर पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिरज शहर गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक आज शहरात गस्त घालत होते. यावेळी म्हैसाळ रस्त्यावर दोघे चोरीची दुचाकी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार दुचाकी विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या या दोघांना उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव यांच्या पथकाने छापा टाकून ताब्यात घेतले. पथकाने दुचाकी बाबत चौकशी केली असता ती दुचाकी मिरजेतील दत्त मंदीर चौकातून चोरली असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसी खाक्या दाखवत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता विविध ठिकाणावरून १३ दुचाकी चोरून त्या विक्री केल्याची कबुली त्यांनी दिली. या दुचाकी जप्त करत पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.

टोकण रक्कम घेऊन दुचाकींची विक्री

संशयितांनी विक्री केलेल्या सर्व दुचाकी या टोकण रक्कम घेऊन विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयितांकडून ठराविक रकमेला व्यवहार ठरविण्यात येत होता. त्यानंतर दुचाकी देऊन काही ठराविक टोकण रक्कम घेण्यात येत होती. व कागदपत्रे नावावर झाल्यावर उर्वरित रक्कम देण्याचा ठराव करण्यात येत होता. परंतु टोकण रक्कम मिळाल्यावर दोघे फरार होत होते.

      हेही वाचा : 

Back to top button