लातूर: कर्णकर्कश हॉर्न, सायलेन्सरचा लातूर पोलिसांकडून चुराडा | पुढारी

लातूर: कर्णकर्कश हॉर्न, सायलेन्सरचा लातूर पोलिसांकडून चुराडा

लातूर, पुढारी वृतसेवा : दुचाकींना मॉडीफाय केलेले सायलेन्सर, हॉर्न लावून कर्णकर्कश आवाज करत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांना त्यांच्या दुचाकींचे हॉर्न काढून घेऊन पोलिसांनी कारवाई केली. तब्बल सव्वाशे हॉर्न, माडीफाय सायलेन्सर रोडरोलर खाली घालून आज (दि.२८) नष्ट करण्यात आले. वाहतूक पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांतून स्वागत केले जात आहे.

शहरात दुचाकीवरून हवा करत फिरणाऱ्या अतिउत्साही युवकांची हवा काढण्याची व त्यांना मोटार वाहन अधिनियम कायद्याचा पाठ शिकवण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांच्या नेतृत्वात वेळोवेळी वाहतूक नियंत्रण शाखेकडून कार्यवाही करण्यात येत आहे. तरीही काही अतिउत्साही युवक वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करून असे हॉर्न वापरताना दिसत आहेत. दंडात्मक कार्यवाही करूनही काही दुचाकीस्वार परत-परत मॉडीफाय सायलेन्सरचा वापर करीत असल्याने वाहतूक पोलिसांनी ते जप्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून ही कार्यवाही करण्यात आली. मागील 3 महिन्याच्या काळात 125 नियमबाह्य मॉडीफाय सायलेन्सर जप्त करण्यात आले होते. त्यानंतर पंचासमक्ष रोडरोलर चालवून नष्ट करण्यात आले. ही कार्यवाही वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम, सहायक पोलीस निरीक्षक प्रतिभा ठाकूर व त्यांच्या पथकाने केली आहे.

हेही वाचा 

Back to top button