सोलापूर : करमाळ्यात आजोबाकडून नातीवर अत्याचार: नात्याला काळीमा फासणारी घटना | पुढारी

सोलापूर : करमाळ्यात आजोबाकडून नातीवर अत्याचार: नात्याला काळीमा फासणारी घटना

करमाळा; पुढारी वृत्तसेवा : करमाळा तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी गोष्ट घडली आहे. ६४ वर्षीय व्यक्तीने आपल्या नात्यातील अल्पवयीन नातीशी जबरदस्तीने अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची करमाळा पोलिसांनी तातडीने दखल घेत गुन्हा दाखल करत दोन तासात संबंधित संशयित आरोपीला जेरबंद केले आहे.

याबाबतचे अधिक अशी, करमाळा तालुक्यातील अल्पवयीन निर्भयास या आजोबाने उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दुपारच्या वेळी झोपेत असताना तिच्यावर अत्याचार केले. यावेळी त्याने कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी निर्भयास ही दिली होती. त्यामुळे भीतीपोटी अल्पवयीन मुलीने आजोबांनी केलेल्या विकृत प्रकारास आई-वडिलांपासून लपवून ठेवले.

या घटनेनंतरही या आजोबांनी अनेक वेळा या नातीवर जबरदस्तीने अत्याचार केला. दरम्यान या मुलीच्या पोटात दुखत असल्याने व तिला वेगळी लक्षणे आढळल्याने मुलीच्या आईने खाजगीत विचारले असता या मुलीने आजोबांनी केलेला प्रकार जबरदस्तीने केल्याचं सांगून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले.

यावेळी पीडित मुलीच्या आईने व पतीसह करमाळा पोलीस स्टेशन गाठले. आणि पोलिसांना घडलेल्या प्रकारणाची माहिती सांगितली. हा प्रकार साधारण मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घडला होता. यावेळी आई बकऱ्या राखण्यास व वडील मजुरी करण्यास गेले होते. याचाच गैरफायदा घेत आजोबाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. याची प्रकरणाची फिर्याद करमाळ्यात पोलीस स्टेशनला दाखल होताच पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर कुंजीर, हवालदार संतोष देवकर, मेजर आनंद पवार यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले.

दरम्यान पीडित मुलीचे पालक हे पोलीस स्टेशनला गेल्याचे कळताच या आजोबांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र करमाळा पोलिसांनी या विकृत आजोबाला बेड्या ठोकल्या. या प्रकारात या गुन्हेगारवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सागर कुंजीर हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा;

Back to top button