सांगली : दिघंची येथील सराफ व्यापा-यास लुटणा-या टोळीस अटक | पुढारी

सांगली : दिघंची येथील सराफ व्यापा-यास लुटणा-या टोळीस अटक

आटपाडी, पुढारी वृत्तसेवा : दिघंची ता. आटपाडी येथील सराफ व्यवसायिक बाबु हणमंत जगताप (वय ४० रा.राजेवाडी ता. आटपाडी) यांचे १ लाख ३७ हजारांचे दागिने लुटणाऱ्या करगणी येथील तीन अट्टल चोरट्यांना माण तालुक्यातील देवापुर ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले. हणमंत रमेश नांगरे (वय २१),संतोष तुकाराम व्हनमाने (२६), संग्राम दत्तात्रय खिलारी (२१ सर्व रा. करगणी ता.आटपाडी) त्यांची नावे आहेत. या चोरट्यांकडून दागिने, बॅग आणि मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी ६ वाजता दिघंची येथील आदीती ज्वेलर्स दुकान बंद करुन बाबू जगताप हे दुकानातील सोने चांदीचे दागीने बॅगेतून घेऊन निघाले होते. मोटारसायकलवरुन घरी जातराजेवाडी गावाकडे असताना दिघंची गावचे ओढयापासुन थोडया अंतरावर ढोले मळा फाटी येथे ते पोहोचले. यावेळी त्यांच्या पाठीमागून एका मोटारसायकल वरुन तीघेजन आले. जगताप यांनी त्यांच्या गाडीच्या टाकीवर ठेवलेली सोने चांदी दागीने ठेवलेली बॅग जबरदस्तीने ओढून घेतली आणि त्यांच्या डोळयात चटणी टाकुन बॅग घेऊन लिंगीवरे गावाच्या दिशेने पळून गेले.

आटपाडी पोलीसांनी या आरोपींकडून १.३७ लाखांचे सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग,मिरची पुड व गुन्हयात वापरलेली मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला.आरोपींना अटक केली असून आज आटपाडी न्यायालयात आरोपींना हजार केले असता नायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कस्टडी दिली.अधिक तपास पोलीस हवालदार सोमनाथ पाटील करत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button