रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात; १ ठार ३ गंभीर जखमी | पुढारी

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात; १ ठार ३ गंभीर जखमी

मिरज : पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटकातील बिदर येथून फरशी आणि ऍसिड घेऊन दोन वेगवेगळे ट्रकचा अपघात झाला. हे दोन्ही ट्रक रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूरकडे निघाले होते.

याबाबत मिळालेल्‍या माहितीवरून, कोल्हापूरच्या दिशेने निघालेले दोन्ही ट्रक मिरज जवळ आले असता ॲसिड वाहून नेणाऱ्या ट्रकला फरशी वाहून येणाऱ्या ट्रकने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. दरम्‍यान पुलाच्या वळणावर फरशी वाहून ट्रकने ॲसिड वाहून नेणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक जोरात दिल्‍याने फरशी वाहून नेणा-या ट्रकचा चक्‍काचूर झाला. तर ॲडीड असलेला ट्रक जागीच उलटा झाला.

यामध्ये ॲसिड ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून क्लिनरसह फरशी ट्रकमध्ये असणारे चालक व क्लिनर यांच्या डोळ्यात ॲसिड गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

-हेही वाचा

पठ्ठ्याने शोरूममधून चोरून नेली पावणेदोन लाखाची जिक्सर…पण केवळ बारा तासात अडकला पोलिसांच्या जाळ्यात

नारायणगाव : डुप्लिकेट नवरीसह सहा जणांची टोळी गजाआड

नगर : ‘आयुष’ विद्युतीकरणाला 45 लाखांची ऊर्जा !

Back to top button