पठ्ठ्याने शोरूममधून चोरून नेली पावणेदोन लाखाची जिक्सर…पण केवळ बारा तासात अडकला पोलिसांच्या जाळ्यात

पठ्ठ्याने शोरूममधून चोरून नेली पावणेदोन लाखाची जिक्सर…पण  केवळ बारा तासात अडकला पोलिसांच्या जाळ्यात

नगर : पुढारी वृत्तसेवा : चोरट्यांची मजल आता शोरूममधून मोटरसायकल चोरण्यापर्यंत गेली आहे. अर्थात पोलिसही चोरट्यांच्या एक पाऊल पुढे असल्याने बारा तासांच्या आत त्याला अटक करण्यात आले. त्याच्याकडून तीन लाख आठ हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली व सायकलही जप्त केली. सागर सीताराम कसपटे (वय 19, एमआयडीसी, गजानन कॉलनी, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. सावेडी नाक्याजवळील सुझुकी मिडास शोरूममधून सोमवारी (दि.5) एक लाख 80 हजार रुपये किमतीची जिक्सर मोटरसायकलची चोरी त्याने केली.

तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने त्याला बारा तासांच्या आत बेड्या ठोकल्या. सहायक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे, उपनिरीक्षक समाधान सोळंके, हवालदार दत्तात्रय जपे, सुनील शिरसाट, अविनाश वाकचौरे, संदीप धामणे, असिम पठाण, अहमदन इनामदार, सूरज वाबळे, सतीश त्रिभुवन, सचिन जगताप, शिरीष तरटे, संदीप गिर्‍हे, गौतम सातपुते, दत्तात्रय कोतकर, सतीश भवर यांनी ही कारवाई केली.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news