Sangli Crime: कान्हरवाडीत वाळू उपसा केल्याच्या वादातून दोन भावांवर हल्ला: एक जण ठार | पुढारी

Sangli Crime: कान्हरवाडीत वाळू उपसा केल्याच्या वादातून दोन भावांवर हल्ला: एक जण ठार

कडेगाव : पुढारी वृत्तसेवा: अवैध वाळू वाहतुकीच्या वादातून धारदार शस्त्रांनी वार करीत एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना
कान्हरवाडी (ता. कडेगाव) (Sangli Crime) येथे घडली. ही थरारक घटना शनिवारी (दि.3) रात्री १० च्या सुमारास घडली. सचिन हणमंत मदने (वय 32 रा.कान्हरवाडी ता.कडेगाव )असे  मृताचे नाव आहे. तर खंडू हणमंत मदने (वय 35) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी लक्ष्मण जगन्नाथ मदने, किरण लक्ष्मण मदने, सुरज संजय मदने, सौरभ संजय मदने, करण गुलाब पाटोळे, महेंद्र बबन पाटोळे (सर्व रा.  कान्हारवाडी, ता. कडेगाव) या सहा जणांविरुद्ध कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कान्हरवाडी (Sangli Crime) येथील सचिन हणमंत मदने (वय 32) व खंडू हणमंत मदने (वय 35) या दोघा भावांनी येरळा नदीपात्रातून वाळूची खेप भरून आणली. या कारणावरून संशयित आरोपींनी शनिवारी रात्री 10 च्या सुमारास कान्हरवाडी हद्दीत येतगाव रस्त्यालगतच्या शेताजवळ हातात धारदार हत्यारे घेऊन बेकायदेशीर जमाव जमवला. यावेळी संशयित आरोपी सुरज संजय मदने याने त्याच्या हातातील तलवारीने व किरण लक्ष्मण मदने याने त्याच्या हातातील चाकूने सचिन हणमंत मदने यास जीवे ठार मारण्याचे उद्देशाने पाठीवर वार केले.

यावेळी लक्ष्मण जगन्नाथ मदने याने त्याच्या हातातील कुऱ्हाडीने खंडू जगन्नाथ मदने यांचे खांद्यावर व पायावर वार केले. यावेळी सौरभ संजय मदने, करण गुलाब पाटोळे, महेंद्र बबन पाटोळे यांनी हातातील लोखंडी गजाने तसेच लाकडी दांडक्याने
सचिन व खंडू यांना मारहाण केली. यामुळे सचिन हणमंत मदने (वय 32) याचा औषधोपचारापूर्वीच मृत्यू झाला. खंडू हणमंत मदने हा गंभीर जखमी झाला आहे. सपोनि संतोष गोसावी अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button