सांगली : चारचाकी खड्ड्यात कोसळून दोघेजण ठार; एक जण जखमी | पुढारी

सांगली : चारचाकी खड्ड्यात कोसळून दोघेजण ठार; एक जण जखमी

जत, पुढारी वृत्तसेवा येळवी – जत राज्यमार्गावर वाहनचालकाचे वेगावर नियंत्रण असल्याने चारचाकी ईरटीका ही गाडी खड्ड्यात कोसळून दोघेजण जागीच ठार झाले आहेत .तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.सुकदेव बिरा खरात (वय ३४),दगडु शंकर करांडे (३५) असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहे. या अपघातात बापू धोंडीबा शिंदे (वय ३८) हा गंभीररित्या जखमी झाला आहे .पुढील उपचारासाठी सांगली येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना येळवी – जत राज्यमार्गावर घोलेश्वर हॉटेलनजीक घडली आहे. या घटनेने हाबसेवाडी (ता. सांगोला) येथे शोककळा पसरली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,सुकदेव बिरा खरात यांची पत्नी आजारी असल्याने तिघेही मित्र चारचाकी गाडीने जतला जाणार होते दरम्यान ते गावाकडे दुपारनंतर परतणार होते.ते जतला गेले नाहीत. रस्त्यातून ते परत गावाकडे जात असताना घोलेश्वर फाट्यापासून थोड्या अंतरावर आले असता भरधाव वेगाने गाडी चालू होती यावेळी अचानक चालू गाडीची चावी निघाल्याने स्टेरिंग लॉक झाले यामुळे गाडी रस्त्याच्या खाली खड्ड्यात कोसळली अपघात भीषण होता याविषयी अपघातात गाडी चक्काचूर झाली. यावेळी जतला जाणाऱ्या एसटी बसेस मधील प्रवासी व वाहक चालक यांनी अपघातग्रस्तांना मदत करण्याचा प्रयत्न केला. यातील बापू धोंडीबा शिंदे यास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गभिर जखमी असल्याने तातडीने सांगली येथील खाजगी रुग्णालयात शिंदे यास हलवण्यात आले आहे.मयत खरात व कारंडे हे दोघेही मित्र होते ते ड्रायव्हर म्हणून मुंबई येथे काम करत होते ते गावाकडे सुट्टीला आले होते सुट्टीत आले आणि काळाच्या महिमात अडकले अशी अवस्था त्यांची झाली आहे. खरात व कारंडे दोघे जागीच ठार झाले होते.

वेगावर नियंत्रण नसल्याने अपघात

तिघेही मित्र ड्रायव्हर म्हणून मुंबई येथे काम करत होते. ते मूळ गावी कामानिमित्त आले होते. एका हॉटेलवर जेवण करून गावी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. गाडीचा वेग इतका भीषण होता गाडी च्या धडकेत तीन झाडे मोडली आहेत. गाडी उलट सुलट चार ते पाच वेळा झाली असल्याचे प्रवासीने सांगितले. भीषण अपघात अंगावर काटे आणणारा होता. केवळ वेगावर नियंत्रण नसल्याने हा अपघात झाला असल्याचे प्रवासांचे मत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button