सांगली : तासगाव येथे तरूणाचा धारधार शस्त्राने वार करून खून

तासगाव, पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्हातील तासगाव येथे इंदिरानगर झोपडपट्टीतील सुरेश दिनकर शिंदे वय (३५) या तरुणांचा तीन ते चार जणानी धारधार शस्त्राने वार करून खून केला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तासगाव येथे इंदिरानगर झोपडपट्टीत एका तरूणांचा 3 ते 4 जणानी धारधार शस्त्राने वार करून खून केला. संशयितांनी गळ्यावर दोन , खांद्यावर दोन तर हातावर एक असे पाच वार शस्त्राने केले आहेत. गळ्यावर वार वर्मी लागल्याने शरीराला रक्त पुरवठ्या करणाऱ्या रक्त वाहिन्या तुटल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. तसेच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता.
दरम्यान, हा खून करणा-या चार संशयितांची नावे पोलिसांना निष्पन्न झाली आहेत. त्यानुसार पोलीस पुढील तपास करीत आहेत. कौटूंबिक वादातून खून झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळली आहे. तसेच मृत सुरेश आणि संशयित मारेकरी हे नातेवाईक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोली करत आहेत.
-हेही वाचा
माणगंगा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कुरघोडीचे राजकारण : अमरसिंह देशमुख
नगर: अतिवृष्टी निधीचा मार्ग मोकळा, आधार प्रमाणिकरण करण्याचे महसूलचे आवाहन