सांगली: शिराळा-कोकरूड रस्त्यावर अपघात; इस्लामपूरच्या बापलेकीचा मृत्यू

सांगली: शिराळा-कोकरूड रस्त्यावर अपघात; इस्लामपूरच्या बापलेकीचा मृत्यू
Published on
Updated on

शिराळा: पुढारी वृत्तसेवा : बिऊर (ता. शिराळा) येथे मोटरसायकल व चारचाकी गाडीच्या झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील वडील व मुलगी दोघे जण ठार झाले. हा अपघात आज (दि.२८) दुपारी चारच्या दरम्यान शिराळा – कोकरूड रस्त्यावर बिऊर, शांतीनगरनजीक घडला. तृप्ती आत्माराम पवार (वय २८, रा. इस्लामपूर) वडील आत्माराम विष्णू पवार (वय ६०, रा. इस्लामपूर) अशी मृतांची नावे आहेत. या अपघाताची शिराळा पोलीस ठाण्यात नोंद झाली.

पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आज दुपारी आत्माराम पवार मुलगीसह मोटरसायकलवरून (एच एच १० ए ई३८०९) इस्लामपूरहून कोकरूड ला घरगुती कामासाठी निघाले होते. यावेळी बिऊर, शांतीनगरनजीक समोरून डॉ. अल्पेश शिवाजी खडतरे (वय ३८, रा. सोलापूर) हे रत्नागिरीहून सोलापूर निघाले होते. यावेळी त्यांच्या चारचाकीची (एम एच १३बी एन २८१६) मोटारसायकलला जोराची धडक बसली. यात मोटारसायकलवरील तृप्ती हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर अवस्थेत आत्माराम पवार यांना शिराळा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. परंतु, प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलला नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर करीत आहेत.

तृप्ती पवार या ईएनटीसी इंजिनिअर असून पुणे येथे खाजगी कंपनीत नोकरी करत होत्या. त्या सुटीसाठी इस्लामपूर आल्या होत्या. तर आत्माराम पवार हे शेतकरी होते. आत्माराम पवार यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news