सांगली : किल्लेमच्छिंद्रगड खूनप्रकरणी पती-पत्नीला पोलिस कोठडी | पुढारी

सांगली : किल्लेमच्छिंद्रगड खूनप्रकरणी पती-पत्नीला पोलिस कोठडी

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा :  किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथील गोपाळ वस्तीत जालिंदर दिनकर जाधव (वय 35) यांच्या खून प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सुनील युवराज चव्हाण (वय 33), त्याची पत्नी जानकी सुनील चव्हाण (वय 27, रा. पार्ले, ता. कराड) अशी पोलिस कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत.

चारित्र्यावर संशय घेऊन जालिंदर हा पत्नी चाँदणी हिला मारहाण करीत होता. सोमवारी, दि. 22 रोजी चाँदणी हिने तिचा भाऊ सुनील, त्याची पत्नी जानकी यांना घरी बोलवून तिघांनी जालिंदर यांना किटली, लाथाबुक्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीत जालिंदर हे ठार झाले होते. मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास संशयित चाँदणी, भाऊ सुनील यांनी लोकांना बोलावून घेतले. त्यांना जालिंदर हा दारू पिऊन मयत झाल्याचा बनाव केला. जालिंदर यांचा मृतदेह गोपाळ वस्तीच्या स्मशानभूमीत पुरण्यात आला.
गुरुवारी रात्री अज्ञाताने पोलिस यंत्रणेेच्या डायल 112 नंबरवरती कॉल करून गोपाळ वस्तीत झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी सूत्रे हालवत संशयित चाँदणी, सुनील, जानकी यांना ताब्यात घेतले. शुक्रवारी रात्री उशिरा सुनील, जानकी यांना अटक करण्यात आली. शनिवारी न्यायालयाने दोघांना 1 जूनपर्यंत पोलिस काठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

Back to top button